Tuesday, 28 July 2015

Surprise on Birthday!!!

Posted by Sushrut Zemse

आज ऑफिस सुटल्यानंतर एका मैत्रिणीसोबत वडापाव च्या गाड्यावर थांबले,
रट्टाऊन वडापाव खाल्ले आणि मग घरचा रस्ता धरला.
घरी गेल्यावर नवरा घरीच होता, त्याने दरवाजा उघडला आणि म्हंटला
तुझ्यासाठी Surprize आहे एक आणि दरवाज्यमध्येच त्याने माझ्या डोळ्यावर
पट्टी बांधली आणि डायनिंग टेबल जवळ घेऊन गेला.
तेवढ्यात टेलिफोन ची रिंग वाजली, तो म्हणाला मी येईपर्यंत डोळ्यावरची
पट्टी काढू नको..!
तो गेला दुसऱ्या रूम मध्ये, फोन वर बोलल्याचा आवाज ऐकू येत होतं मला.
4-5 वडापाव खाऊन पोट खूप गच्च झालं होतं, म्हंटल याने काहीतरी खाण्यासाठी
बनवलं असणार, तो येण्याअगोदर जरा हलकं व्हावं..!
मग काय, बसल्या बसल्या हळूच एक पाव वर केला आणि 'पुरररररररर्र'..
जरा बर वाटलं पण वास खूपच घाण येत होता म्हणून जवळच्या हातरुमाल ने वारा
घेऊन gas बाजूला केला....
त्याचं फोन वरचं बोलणं सुरूच होतं, तेवढ्यात दुसरा पाय वर केला आणि
पुन्हा एकदा 'पुररररररररररररर्र'......वास लईच घाण होता...! मग अजून थोडा
वारा घेतला....तेवढ्यात त्याने फोन ठेवला आणि तो येऊ लागला..!
मी आपलं रुमाल खाली ठेवला, दोन्ही हात टेबल वर ठेवले आणि भोळा चेहरा करून
शांत बसले, जसं काही झालंच नाही..!
तो आला, त्याने विचारलं पट्टी तर काढली नव्हती ना डोळ्यावरची..
मी पण आपलं लाडात म्हंटल, नाही रे माझ्या राजा....
त्याने हळूच डोळ्यावरची पट्टी बाजूला केली आणि पाहते तर काय...!!
डायनिंग टेबल वर आमचे सर्व मित्र नाकाला हात लाऊन बसलेले आणि मोठ्याने
ओरडले, 'Happy Birthday....

No comments:

Post a Comment