Sunday, 24 November 2013

पुणेरी विनोद Puneri jokes- funny marathi jokes

Posted by Sushrut Zemse

पुणेरी विनोद Puneri jokes- funny marathi jokes

1)चितळे उघडले आहेत
पुण्याला डेक्कनच्या चौकात CCTV कॅमेरे बसवले...
दुसऱ्या दिवशी सकाळी पोलिस कंट्रोल
रूमला आलेला पहिला फोन..:

.
.
.
"अहो, जरा कॅमेरात बघून सांगा ना, चितळे उघडले
आहेत का...?"


2)आई...."पुणे आलं"
रेल्वेमध्ये आई आणि मुलगा प्रवास करत
असतात...
.
.
आई म्हणते "बाळा कोणतं स्टेशन आलं रे"
.
.
मुलगा खिडकीतून बाहेर बघतो....
प्लॅटफॉर्मवर
उभ्या असलेल्या माणसाला विचारतो "काका कोणतं
स्टेशन आहे हे?"

.
माणूस:- देवाने जे दोन डोळे दिलेत ना, त्याचा वापर
करा....
गाडी फलाटावर येताना काय झोपा काढत
होता का...?
मोठी काळी-
पीवळी पट्टी दिसली नाही स्टेशनची येताना...?
तुम्ही हल्लीची पोरं....
कष्ट करायला नकोत...
सगळं आयतं पाहीजे...
.
मुलगा:- आई...."पुणे आलं"

3)Puneri IPL Team notice boards @नेहरू स्टेडीयम
1. रात्रीच्या सामन्याचा चार्ज वेगळा पडेल.
कुठल्याही परिस्थितीत रात्री ११
वाजता सामना संपविण्याची जवाबदारी आयोजकांवर
राहील.
सवड मिळाल्यास उरलेला सामना पुढील
दिवशी खेळता येईल
@ the Pavilion
१ ."फलंदाजा कडून धावा निघत नसतील तर मैदानावर
उगीच टवाळक्या करत बसू नये"
२. गोलंदाजांनी चेंडू जपून वापरावा व
फलंदाजांनी जपून टोलवावा, अन्यथा प्रत्येक नविन
चेंडूचे ३० रुपये आकारण्यात येतील.
३. क्षेत्ररक्षकांनी दुपारी १ ते ४ या वेळेत उगीचच
Howzzat म्हणून गोंधळ करू नये. जवळ सदाशिव पेठेतील
लोक झोपलेली असतात.
@the Stadium Gates
१ . सामन्याची वेळ तुमच्या तिकिटावर छापलेली आहे.
उगाच कधीही येऊन गर्दी करु नये.
२. सामन्याच्या वेळेच्या आधी ३० मिनिटे मैदानात
प्रवेश दिला जाईल.
तुम्ही गडबड केल्याने सामना लवकर सुरु होणार नाही.
३. खुर्चीचा वापर फक्त बसण्यासाठीच करावा.
एका खुर्चीवर एकच !
४. मैदानात पिण्यासाठी (साध्या)
पाण्याची व्यवस्था केली आहे.
5. फुंके (सिगारेट, बिड्या, चिलीम), थुंके (तंबाखु, गुटका,
मावा, पान) आणि शिंके ( तपकीर आणि स्वाईन
फ्ल्युग्रस्त ) ह्यांना मैदानात मज्जाव.
6. मैदानात दारु विक्री केली जात नाही. मैदानात दारु
पिऊ दिली जात नाही, मैदानात बाहेरुन दारु पिऊन
आल्यास प्रवेश मिळणार नाही.
7. फिल्टर्ड पाणी आपण दिलेल्या तिकिटाच्या पैशात
मिळणार नाही, उगाचच आयोजकांकडे हट्ट धरु नये.
@the Stadium Stands
१ . मैदानावरचे कॅमेरे हे
सामन्याच्या हालचाली टिपण्यासाठी आहेत, उगाच
हिडीस चाळे करुन त्यांचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न करु
नये.
२. आपण पुण्यासारख्या एका सुसंस्कृत शहरात
एका सार्वजनिक ठिकाणी सामना पहात आहोत ह्याचे
भान ठेऊन, चियरलिडर्सना खाणाखुणा करु नये;
किंवा त्यांच्याकडे डोळे फाडुन बघुन लाज आणु नये.
अश्लील चाळे कराल तर नुसतीच पोलीस कारवाई
नाही तर धिंड काढण्यात येईल.
३. सामन्याच्या वेळी खेळाडुंना पाठिंबा देतानाहळु
आवाजात आरडाओरड करावी.
हा क्रिकेटचा सामना आहे, तमाशाचा फड नाही.
४. अनोळखी वस्तुंना स्पर्श करू नये ...व्यक्तिंसह !
५. सामन्याच्या दरम्यान तुटलेल्या चपला,कापलेले
खिसे, मोडलेला चष्मा, हरवलेलीपर्स, गायब
झालेला मोबाईल ह्यांचीजवाबदारी आयोजकांकडे
राहणार नाही. समोरच स्वारगेट पोलीस स्टेशन आहे.
तिकडे जाऊन तक्रार करावी.
६. हे पुणे आहे शिमला नव्हे! उन्हाळ्यात गरमहोणारच,
पण म्हणून सामना पाहायलामैदानात शर्ट काढून बसू
नये. अशा निर्लज्ज प्रेक्षकांना बाहेर काढण्यात येईल.
७. पाऊस पडून सामना रद्द झाल्यास पैसेपरत मिळणार
नाहीत. कृपया हवामान खात्याशी सल्ला मसलत करून
मगच तिकीट काढावे.

4) चायला! परत पुण्यात जन्माला आलो
एक बाळ जन्माला आल्या-आल्या बोलायला लागतो,
तो nurse ला विचारतो, खायला काय आहे?
nurse : पोहे आणि उपीट तयार आहे...
मुलगा: चायला! परत पुण्यात जन्माला आलो....!!

5)पुणेरी boyfriend मुलगा : I'll climb the tallest mountain, swim the deepest sea, walk on fire just for you......
मुलगी: wow, किती romantic
6)पाऊस पडतोय, आई ओरडेल...!
तू मला आत्ता भेटायला येशील का ?
मुलगा : आत्ता लगेच नको, पाऊस पडतोय, आई ओरडेल...!

7) चहा
 एक पुणेरी मुलगा आपल्या मित्रांना घरी घेऊन आला आणि म्हणाला, " थांबा मी चहा घेऊन आलो..."
१० मिनीटांनी, " चला माझा चहा घेऊन झाला आपण आता जाऊया...!"

8)लॉटरी
स्थळ : सदाशिव पेठ, पुणे.
जोशीकाका : काय तात्या, आज अगदी आनंदात दिसता आहात ! काय झालं ?
तात्या : अहो, आमच्या शेजारच्या कुलकर्ण्यांना १ लाख रुपयाची लॉटरी लागलीये!
जोशीकाका : मग तुम्हाला का इतका आनंद झालाये ?
तात्या : त्याला आता तिकिट सापडत नाहीये !

9)प्लास्टिक सर्जरी
स्थळ: (पुण्याशिवाय दुसरे असू शकत नाही.)
पेशंट:- डॉक्टर, प्लास्टिक सर्जरी करायची आहे, साधारण किती खर्च येईल?
डॉक्टर:- ३ लाख रुपये.
पेशंट (थोडा विचार करून):- आणि प्लास्टिक आम्ही आणून दिले तर..??

10)प्रेम अन दारू
गुरूजी- गण्या,सांग बरे ,प्रेम अन दारू यामध्ये काय फरक आहे...?
गण्या- सोप्पय गुरूजी....
दारू जास्त झाली तर पोरगा
उल्टी करतो...
अन प्रेम जास्त झाल तर पोरगी
उल्टी करते......
11) गैर
भक्त : भगवंता, लग्न झाल्यावर परस्त्री
बरोबर झोपणे गैर आहे का ?
देव : अजिबात नाही. पण अडचण हि आहे
कि तुम्ही लोक नुसते " झोपत " नाही !!!! [

No comments:

Post a Comment