Tuesday, 25 March 2014

FUNNY MARATHI JOKES COLLECTION 3

Posted by Sushrut Zemse

FUNNY MARATHI JOKES COLLECTION 3

1) दारू आणि चकणा 
सर: इंग्रजांनी चंद्रावर
पाणी &बर्फाचा शोध लावला आहे.
आता सांगा तुम्ही यातून काय शिकल?
.

.
गण्या : सर आता फक्त आपल्याला दारू
आणि चकणा घेऊन जायच आहे.


2) पत्र
चंदूच्या बायकोचे मराठी थोडे कच्चे असते....
तिला पूर्ण विराम कोठे द्यायचं ते कळत नसते....
तरी तिने चंदुला पत्र लिहिले आणि मग पूर्ण विराम देऊन टाकले मध्ये मध्ये ते असे....
प्रिय प्राण नाथ, तुमची आठवण येते माझ्या मैत्रिणीला. काल मुलगा झाला आजीला.दम्याचा त्रास होतो कुत्रीला. आज चार पिल्ले झाली मामाला. दाढी करताना ब्लेड लागली वहिनीला. दवाखान्यात अँडमीट केले बकरीला. हजार रुपयात विकले आत्याला. नमस्कार तुमची लाडकी गंगू...¡¡...


3)अमिताभ बच्चन
एक मुलगा आपल्या गर्लफ्रेंडच्या घरी फोन लावतो...
तिचे वडील फोन उचलतात..
मुलगा मनात म्हणतो.. हे भगवान हा रावण कुठून
आला..
वडील : हेल्लो, कोण बोलताय ?
मुलगा : मैं अमिताभ बच्चन बोल रहा हूँ "कौन बनेगा करोड़पति" से ओर
आपकी बेटी की फ्रेंड हॉट सीट पर बेठी है ओर
आपकी बेटी की मदद चाहती है, उसको फोन दीजिये
सर,
वडील : ओह, आश्चर्यचकित होऊन मुलीला फोन
देतात मुलगा : सवाल यह "आज शाम को तुम
कहाँ मिलोगी ?"
Option A : सारसबाग
Option B : झेड ब्रिज
Option C : कोरेगओन पार्क
Option D : पुणे सेन्ट्रल मॉल मुलगी : "Option B"
मुलगा : धन्यवाद, ओर अब आप का समय समाप्त
होता है,..


4)रबर दे रबर
तुझे ना थी मेरे दर्द की खबर......

वाह्..... वाह्....

तुझे ना थी मेरे दर्द की खबर....
.
अर्र्र्र्...... .
.
.
कविता चुकली....रबर दे रबर .......


5) रागवायचा प्रश्न येतोचं कुठे ?
काही मुलं, मुलींना'आयटम'म्हणून बोलतात,
जे मुलींना बिलकुल आवडत नाही..

पण रागावण्याचं कारणचं नाही,
कारण...,
...
त्यातला छुपा गर्भित अर्थ असा होतो..
आयटम म्हणजे माल,
माल म्हणजे पैसा..
आणि पैसा म्हणजे लक्ष्मी,
आणि मुलीला तर
घराची लक्ष्मी म्हणतात..
मग रागवायचा प्रश्न येतोचं कुठे ?


6)मार्च एन्डचं प्रेशर
चंप्या सुखनिदेत निमग्न होता. अचानक बिछान्यावर प्रकाश पसरल्यानं दचकून तो जागा झाला. पाहतो तो रेड्यावर स्वार झालेले यमराज बेडरूममध्ये उभे. भयानं त्याचीबोबडीच वळली. प्रसन्न हसून यमराज म्हणाले, ”घाबरू नकोस चंप्या. मी तुला गुड न्यूज द्यायला आलो आहे. आणखी २० वर्षे तू ठणठणीत राहणार आहेस. मृत्यू तुझ्या केसालाही स्पर्श करणार नाही. अरे झोपलायस काय इथे ? जा, बाहेर जा. मजा कर. ही आनंदाची बातमी मस्तपैकी सेलिब्रेट कर.” यमराज अदृश्य झाले. चंप्याने तात्काळकपडे बदलून बाहेर धाव घेतली. आनंदानं वेडा होऊन तो रस्त्यातून नाचतच चाललाअसताना एक ट्रक सुसाट वेगानं आला आणिचंप्याला चिरडून गेला… … स्वर्गनरकाच्या प्रवेशद्वारावर यमराजाशी गाठ पडताच चंप्यानं कळवळून विचारलं, ”का खोटं बोललात माझ्याशी? . का?”. . . . . .यमराज ओशाळून म्हणाले,”सॉरी यार! मार्च एन्डचं प्रेशर असतं… काही करून टार्गेट पूर्ण करायचं असतं!!!

 7)मी एकटीच आहे, आत या ना.
एकदा माझ्या गर्लफ्रेंडने मला तिच्या घरी बोलावले,
मी तिच्या घरी गेलो, बाइक कडेला लावली आणि बेल
वाजवली
.
.
तिच्या छोट्या बहिणीने ... दार उघडले, ती पण खूप सुंदर होती.
.
... ती हसून बोलली"तुम्ही खूप हॅन्डसम आहात,
आत्ता घरी तर कोणीच नाही.
मी एकटीच आहे, आत या ना."
.
.
मी थोडा विचार केला आणि तिला स्माइल देउन परत फिरलो..
तेवढ्यात तिचा सर्व परिवार बाहेर आला..
मुलीचे वडीलः बेटा आम्हाला असाच
मुलगा हवा होता. तु आम्हाला पसंत आहेस...
.
आता त्यांना काय सांगु मी बाइक लॉक करुन परत येनार होतो..
 


8)आमच्या काही अल्प मागण्या
एकंदरीत आजची राजकीय परिस्थीती पाहता प्रत्येक मताला महत्व आहे तेव्हा आम्हीही आमच्या काही अल्प मागण्या मांडत आहोत.त्या मागण्या जो पक्ष मान्य करणार त्याला आमचा जाहिर पाठिंबा....
१.अखिल भारतात कुठेही दारुबंदी नसावी.उलट ज्या राज्यात दारुबंदी आहे ती त्वरीत उठवावी.
२.दारुवर कुठलेही कर नसावेत.
३.दारुला अत्यावश्यक सेवेचा दर्जा द्यावा म्हणजे बंद/हरताळ काळात दारु सुलभ उपलब्द होईल.
४.स्वस्त दारुविक्री केंद्र प्रत्येक गल्लीत असावे.
५.दारुविक्री आणि पिण्यासाठी परवानापध्द्त रद्द करावी.
६.दारुला राष्ट्रीय पेय जाहिर करावे.
७.आधारकार्ड प्रमाणे दारुपिणा-यांसाठी उधारकार्ड देण्यात यावे.म्हणजे महिनाअखेरीस उधारीवर दारु पिणे सुलभ होईल तसेच या उधारीची परतफेड शासनाने करावी.
८.दारु पिणा-यांस प्रोत्साहन म्हणुन राष्ट्रीय पुरस्कार जाहिर करावा.
या अटी मान्य असणा-या पक्षाने पाठिंब्यासाठी कुठल्याही बार मधिल आमच्या आजीव सदश्यास त्वरीत संपर्क साधावा.तुमचा विजय आजच निश्चित करा.
 


9)सिगरेट
रावण : सिगरेट आहे का रे?
कुंभकर्ण : नाही... संपल्या.
बिभिषण : अरे नाही काय म्हणतोस
एक पाकीट आहे ना अजून!

कुंभकर्ण : तु जरा शांत बस ना!
त्या साल्याला दहा तोंडे आहेत....
एका मिनिटात पाकीट संपवेल..
 


10)इम्रान हाश्मी
चिँगीः आपल्या गावात हिरो आलाय, मी जाते पाहायला...
आईः नको हे हिरो काही चांगले नसतात......
चिँगीः जाउदे ना, अग इम्रान हाश्मी आहे.......
आईः काय, इम्रान हाश्मी ?????
अंग बाई!
....
तुझ्या आजीला पण आत बोलावून घे... 

No comments:

Post a Comment